Nana Patole : सरकारच पितळ उघडं पडलं; चेंबूरमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर नाना पटोले सरकारवर बरसले

मुंबई : राज्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यातच मुंबईत जागोजागी पाणी साचणे, झाडं उन्मळून पडणे हे चित्रदेखील पाहायला मिळत आहे. अशातच पहिल्या मुसळधार पावसात काल, मंगळवारी चेंबूर येथे एका स्कूलबस वर झाड पडल्याने १० मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यूदेखील झाला. या मुद्द्यावरून आज विरोधकांनी […]

Nana Patole : सरकारच पितळ उघडं पडलं; चेंबूरमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर नाना पटोले सरकारवर बरसले

मुंबई : राज्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यातच मुंबईत जागोजागी पाणी साचणे, झाडं उन्मळून पडणे हे चित्रदेखील पाहायला मिळत आहे. अशातच पहिल्या मुसळधार पावसात काल, मंगळवारी चेंबूर येथे एका स्कूलबस वर झाड पडल्याने १० मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यूदेखील झाला. या मुद्द्यावरून आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार अजून किती लोकांचा जीव घेणार?, असा संतप्त सवाल केला आहे. तसेच, काल चेंबूरमध्ये झालेल्या घटनेमुळे सरकारचं पितळ उघडं पडलं आहे. इतक्या हलक्या पावसामध्ये मुंबईची वाहतूक ठप्प होत आहे. झाडं पडून मुलाचा मृत्यू होत आहे. याची जबाबदारी भाजप आणि महायुती सरकारची आहे. महानगरपालिका अधिकारी पदाधिकारी आणि राज्य सरकारवर गुन्हा दाखल व्हायला हवा. सत्तेत बसलेल्यांवर कारवाई व्हायला हवी. तरच न्याय मिळेल. अध्यक्ष विधानसभेमध्ये सरकारची बाजू घेत आहेत. या सरकारचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. 

हेही वाचा : Bajrang Sonwane Beed : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा, बजरंग सोनवणे थेट म्हणाले, ‘आम्ही आठही खासदार…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number