गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी ८४-८४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संसदेच्या आवारामध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केले. काँग्रेसने यावेळेस महागाईच्या विरोधात देशभरामध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतारणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनादरम्यान, काँग्रेसच्या खासदारांनी एका दुचाकीला हार घालून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध नोदंवला आहे. दुचाकीला हार घालणाऱ्या काँग्रेस खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश होता.
मुंबई पेट्रोल ११६.७२ डिझेल १००.९४
औरंगाबाद पेट्रोल ११६.५३ डिझेल ९९.२३
कोल्हापूर पेट्रोल ११५.७१ डिझेल ९८.४७
पुणे पेट्रोल ११५.३७ डिझेल ९८.१२
नागपूर पेट्रोल ११५.८० डिझेल ९८.३७