म्हणून थेट 68 विद्यार्थिनींना काढायला लावली कॉलेजमध्ये अंतर्वस्त्रं

गुजरात येथील भूजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजने 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवली आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे […]

म्हणून थेट 68 विद्यार्थिनींना काढायला लावली कॉलेजमध्ये अंतर्वस्त्रं

गुजरात येथील भूजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजने 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवली आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

गुरुवारी हॉस्टेलच्या अधिक्षिका अंजलीबेन यांनी कॉलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली.

त्यानंतर मुलींना वर्गातून बाहेर काढण्यात आले.

कुणाची मासिक पाळी सुरु आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी दोन मुलींनी हात वरती केले.

त्यांना बाजूला काढण्यात आले.

त्यानंतर 68 मुलींना स्वच्छतागृहात नेण्यात आलं.

तिथे त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यात आली.

गुरुवारी झालेल्या प्रकारानंतर 68 मुलींनी आंदोलन केलं.

महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा आहे. त्यामुळे हे प्रकरण इथेच संपवा असे सांगितले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number