साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका

गेल्या काही दिवसांत राज्यात थंडी वाढली असून साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी महाबळेश्वर गाठले असून महाबळेश्वरचा पारा ६ अंशांवर पोहचला आहे. तर लिंगमळ्यात फुलांवरचे दवबिंदू गोठले आहेत. सातारा-पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका शनिवारी अचानक वाढला आहे. महाबळेश्वरचा पारा तब्बल ६ अंशावर आल्याने महाबळेश्वरमधली अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. […]

साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका

गेल्या काही दिवसांत राज्यात थंडी वाढली असून साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी महाबळेश्वर गाठले असून महाबळेश्वरचा पारा ६ अंशांवर पोहचला आहे. तर लिंगमळ्यात फुलांवरचे दवबिंदू गोठले आहेत.

सातारा-पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका शनिवारी अचानक वाढला आहे. महाबळेश्वरचा पारा तब्बल ६ अंशावर आल्याने महाबळेश्वरमधली अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात ज्या ठिकाणी बोट उभ्या केल्या जातात त्या जेटीवर, गाड्यांच्या टापांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू गोठल्याचे पहायला मिळाले. या भागात पडत असलेल्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर मध्ये येत असतात. लिंगमळा भागात गवंतांवर फुलांवर दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number