CJP Committee Members : अभिजीत दीपकेंनी आखली पुढील रणनीती! CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; 13 सदस्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल टाकत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली आहे.

CJP Committee Members : अभिजीत दीपकेंनी आखली पुढील रणनीती! CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; 13 सदस्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल टाकत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील कामकाजाला गती देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यावेळी पक्षाने स्पष्ट केले आहे की, पुढील सहा महिन्यांत देशभरात राज्य समन्वय समित्या आणि लोकसभा स्तरावरील समित्या स्थापन केल्या जातील. सीजेपीने हेही स्पष्ट केले आहे की, पुढील सहा महिन्यांत, CJP संपूर्ण भारतात राज्य समन्वय समित्या तसेच लोकसभा आणि शहर-स्तरीय समन्वय गट स्थापन करेल. आज जाहीर केलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीची CJP चे पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही.

आमच्या कार्ययोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, राष्ट्रीय कार्यकारिणीने आमच्या पहिल्या राष्ट्रीय नेतृत्व टीमवर शिक्कामोर्तब केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या राहत्या घरी सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. बैठकीसाठी केवळ ठराविक व्यक्तींनाच निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप करत गुजरातहून आलेले दोन तरुण अभिजीत दीपके यांच्या घरासमोर आंदोलनाला बसले आहेत. सर्व आंदोलनकर्त्यांना बैठकीत सहभागी करून घ्यावे, अशी त्यांनी मागणी केली. यानंतर आता कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची नावे अधिकृतपणे जाहीर केली आहे. 

हेही वाचा- Abhijeet Dipke CJP : आता पुढे काय? CJP चं नवीन मिशन ठरलं! आता 'या' पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करणार; दीपकेंनी सर्वचं सांगितलं

संघटनात्मक रचना आणि राष्ट्रीय विस्ताराची रूपरेषा

संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक: अभिजीत दिपके (30)
सह-संयोजक: आशुतोष रांका (30), सौरव दास (27)
राष्ट्रीय संघटना प्रमुख: अजिंक्य शिंदे (35)
सह-संघटना प्रमुख: दीपक बलियान (26)
राष्ट्रीय सचिव: आफ्रिन नवाझ (34)
मीडिया प्रमुख: विजय रेड्डी मल्लंगी (30)
कायदेशीर कामकाज प्रमुख: रत्ना सिंग (31)
संशोधन आणि धोरण प्रमुख: वैष्णवी गौर (29)
तंत्रज्ञान प्रमुख: रोहन देशपांडे (31)
वित्त प्रमुख: योगेश इंगळे (33)

प्रादेशिक नेतृत्व

उत्तर विभाग: दीपक बलियान (26)
दक्षिण विभाग: विजय रेड्डी मल्लंगी (30)
पूर्व आणि ईशान्य विभाग: अंकित भारद्वाज (35)
पश्चिम विभाग: योगेश इंगळे (33)

CJP च्या या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विविध क्षेत्रातील सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या टीमवर असणार आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्यावर आणि देशभरात आपला विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, 13 नेत्यांवर सोपवण्यात आलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे CJP च्या पुढील वाटचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number