नाशिक शहरात सीएनजीचा तुटवडा

नाशिक, १९ मे २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात सीएनजीचा माेठ्या प्रमाणात तुटवडा‎ निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने शहरातील काही सीएनजी पंपदेखील बंद होते. गुरुवारी मात्र एमदमच‎ तुटवडा निर्माण झाल्याने शहरासह बाहेरुन‎ येणाऱ्या अनेक वाहनचालकांचा खाेळंबा झाला. पंपचालकांना देखील याची आर्थिक झळ‎ साेसावी लागली. तांत्रिक कारणामुळे मुख्य कंपनीकडून सीएनजी पुरवठा होत […]

नाशिक शहरात सीएनजीचा तुटवडा

नाशिक, १९ मे २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात सीएनजीचा माेठ्या प्रमाणात तुटवडा‎ निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने शहरातील काही सीएनजी पंपदेखील बंद होते. गुरुवारी मात्र एमदमच‎ तुटवडा निर्माण झाल्याने शहरासह बाहेरुन‎ येणाऱ्या अनेक वाहनचालकांचा खाेळंबा झाला.

पंपचालकांना देखील याची आर्थिक झळ‎ साेसावी लागली. तांत्रिक कारणामुळे मुख्य कंपनीकडून सीएनजी पुरवठा होत नसल्याची पंप चालकांची प्राथमिक माहिती आहे. नाशिकमधील‎ जवळपास ८ ते १० हजार वाहने‎ सीएनजी आहेत. अशातच; मागच्या २ दिवसात या वाहनांना सीएनजी न मिळाल्याने‎ मनस्ताप सहन करावा लागत आहे.‎ यामध्ये रिक्षा, चार चाकी वाहन, खासगी‎ गाड्या, अश्या अनेक वाहनांचा समावेश आहे.

सीएनजीचा पुरवठा‎ ‎अचानक बंद केल्याने‎ ‎पंपचालकांना‎ ‎वाहनधारकांच्या राेषाला‎ ‎सामाेरे जावे लागले.‎ आता नेमका सीएनजीचा पुरवठा कधी‎ सुरळीत हाेणार ह्या बाबत अद्यापही प्रश्नचिन्हच उपस्थित आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number