मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 'महावस्त्र पैठणी' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. या दरम्यान, हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठल लंघे, सुरेश चव्हाणके, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर, शिंदेंनी घेतली शहा-मोदींची भेट, भेटीमागील कारण काय?

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. तसेच, ‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठणी साडी या जिल्ह्याच्या उत्पादनाला चालना दिली आहे. या संदर्भात, पैठणमध्ये उत्पादित होणाऱ्या पैठणीची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यासह, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number