मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला!

पेण येथे आज मोठा अनर्थ टळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता. मात्र सुदैवाने अपघात टळला आणि मुख्यमंत्री सुरक्षित आहेत. काय घडलं नेमकं? अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झालं. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखं […]

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला!

पेण येथे आज मोठा अनर्थ टळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता. मात्र सुदैवाने अपघात टळला आणि मुख्यमंत्री सुरक्षित आहेत.

काय घडलं नेमकं?

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झालं.

पाऊस पडल्याने माती भिजली होती.

त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखं नरम झालं असावं.

संध्याकाळी 4.25 ला पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झालं. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवलं.

त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले.

हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे पीए, एक इंजिनियर, पायलट आणि को-पायलट असे पाचजण बसले होते.

हे हेलीकॉप्टर हेलिगो चार्टर प्रा.लि.चं होतं.

या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number