CM Devendra Fadanvis on Lockdown : "राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही", मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

राज्यात लॉकडाऊन लागणार का?

CM Devendra Fadanvis on Lockdown : &quotराज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही&quot, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

आखाती युद्धाचा परिणाम सध्या जगभरात बघायला मिळत आहे. होर्मूज सामुद्रधुनीमधून गॅस टँकर, जहाज वाहतूक करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशात काही प्रमाणात इंधनसाठा असल्याच्या अनेक चर्चा सुरु झाल्या. इंधनसाठा कमी असल्याने आता पुढे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला. अशातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळात लॉकडाऊन लागला तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते असे म्हणाले. त्यामुळे खरंच आता लॉकडाऊन लागणार का? अशी भीती सर्वांच्याच मनात निर्माण झाली. 

सध्या संपूर्ण देशभरात  लॉकडाऊन लागणार का? याबद्दल मोठा प्रश्न उपस्थित होतआहे. अशातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी मोठी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात इंधनाचा पुरेसासाठा आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

दरम्याने यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जनतेला केलं आहे. त्याचप्रमाणे राज्यात अजून एक-दोन महीने पुरेल इतका इंधनसाठा आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number