राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. विशेषतः काही लाभार्थी अपात्र ठरल्यास त्यांच्याकडून मिळालेल्या रकमेची वसुली केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भूमिका स्पष्ट केली आहे.
फडणवीस म्हणाले की, योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो महिलांमध्ये काही प्रकरणांमध्ये पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मात्र, लाभार्थी महिलांनी जाणूनबुजून चुकीची माहिती दिली आहे का किंवा प्रशासनाच्या स्तरावर काही त्रुटी झाल्या आहेत का, याची तपासणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.
तसेच नंतर ते म्हणाले की, ज्या 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल केली जाणार नाहीत. पण जे निकष पूर्ण करत नाहीत त्यांना पैसे वसूल करणार नाही. मात्र जे पुरुष आहेत ज्यांनी फसवेगीरी करून लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. केवायसी करायला विंडो औपन करायला तयार आहोत.
शेवटी ते म्हणाले की, 'आयकर विभागाच्या मदतीने सरकारकडून लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केलेल्या अर्जांची छाननी केली जात आहे. हे काम असून सुरूच आहे. लाडक्या बहिणींकरिता एक दिलासादायक बातमी म्हणजे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.