चौंडीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 80 कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी मर्यादित या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

चौंडीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 80 कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन

स्वप्नील झोडगे. प्रतिनिधी. अहिल्यानगर: महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन, आणि वस्त्रोद्योग विभागांच्या अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी मर्यादित या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. माहितीनुसार, हा भव्य प्रकल्प सुमारे 80 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा: मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन
 

आर्थिक विकासाला चालना देणारा प्रकल्प:

राज्याच्या ग्रामीण आणि शेतकरी भागातील आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या सूतगिरणी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारासाठी मोठी संधी मिळणार आहे. त्यासोबतच, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.

हेही वाचा: महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार; जाणून घ्या
 

मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी भूमिपूजन समारंभ:

मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी हा भूमिपूजन समारंभ पार पडला होता. यादरम्यान, अनेक मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या सहकार धोरणांतर्गत सहकारी संस्था आणि उद्योगांना बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number