‘स्वछ भारत, स्वस्थ भारत’
‘स्वछ भारत, स्वस्थ भारत’ या मोहिमेअंतर्गत भारत सरकारने सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये आणि खासगी कार्यालयात किंवा कार्यालयासमोर धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये आणि या कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक सुद्धा काढले आहे. तसेच कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा आणि महाविद्यालये येथे नागरिकांच्या संरक्षणाकरिता सिगारेट, तंबाखू, तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम ४ अन्वये तंबाखू खाणे, थुंकणे, धूम्रपान करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. शासकीय इमारतीच्या परिसरा रांमध्ये धूम्रपान करणे आणि थुंकणे हा दंडात्मक गुन्हा आहे. असे केल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
जन सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ मोहिमेद्वारे शासकीय इमारतीची साफसफाई करुन शासकीय कार्यालये आणि त्या सभोवतालचा परिसर हा ‘तंबाखू मुक्त परिसर’ म्हणून जाहीर केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला २०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.