मुख्यमंत्री भाजपाचाच असावा

विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री असावा असा आग्रह भाजपा नेते करत आहेत.

मुख्यमंत्री भाजपाचाच असावा

मुंबई : महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. 132 आमदार निवडून आल्याने भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा असला तरी पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. यामुळेच भाजपचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. भाजपाचे राजनाथ सिंह रविवारी मुंबई दौऱ्यावर असून ते महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल दिल्लीतील नेत्यांना देणार आहेत. दरम्यानशिंदे यांच्या  नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या गेल्या. त्यांनाच मुख्यमंत्री पदी बसवावे अशी आमच्या पक्षाची भूमिका असून महायुतीचे नेते एकत्रितपणे यावर सकारात्मक निर्णय घेतील हा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. राज्यात 66.05 टक्के मतदान झाले. त्यानंतर शनिवारी २३ नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूकीची मतमोजणी पार पडली. महाराष्ट्रात महायुतीला महाविजय मिळाला. महायुतीचे २३० उमेदवार विधानसभेवर निवडून गेले. त्यापैकी भाजपा 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजयी झाले आहेत.  

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number