CM Devendra Fadnavis Bike Ride : वर्षा बंगला ते विधान भवन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाईकस्वारी; पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात थेट बाईकवरून एन्ट्री घेतली.

CM Devendra Fadnavis Bike Ride : वर्षा बंगला ते विधान भवन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाईकस्वारी; पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात थेट बाईकवरून एन्ट्री घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल बचतीच्या आवाहनानंतर आज, गुरुवारी मुख्यमंत्री हे वर्षा बंगल्यापासून विधान भवनापर्यंत बाईकवरून आले. यावेळी मंत्री आशिष शेलार हे त्यांच्या मागे बसलेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री नेहमी त्यांच्या आलिशान गाडीतून कडेकोट सुरक्षेत तीन – चार गाड्यांच्या ताफ्यासोबत फिरतात. मात्र इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपी ताफा बाजूला ठेवून दुचाकीवर येणे पसंत केले. त्यांच्या या आगमनाने उपस्थितांचे डोले विस्फारले. तसेच इतरांनीही इंधन बचतीचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केले आहे.

हेही वाचा : Nitin Gadkari Bus Travel : पंतप्रधानांच्या आवाहनाला गडकरींचा प्रतिसाद; वाहनांचा ताफा टाळत गडकरींचा साधेपणाचा संदेश

दरम्यान, पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, #स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विविध विभागांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाच्या प्रस्तावित उपाययोजनांमध्ये परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापर वाढविणे, #ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, तसेच डिजिटल माध्यमातून बैठका घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द करण्यात येणार असून, नव्या दौऱ्यांचे नियोजन टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाहनांच्या वापरात कपात करून कारपूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचेही सुचविण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number