मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावरुन प्रवासही केला. 

हेही वाचा : ठाकरे गटाचा 9 जूनला मेळावा होणार; आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार

आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी-आमणे हा 76 किमीचा शेवटचा टप्पा आहे. 35 मीटर रूंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे. आता मुंबईकरांना फक्त 8 तासांत नागपूर गाठता येणार आहे. तर नाशिक येथून मुंबई फक्त अडीच तासांत गाठणं शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 6 लेनचा,120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांबीची महामार्ग आहे. ताशी 150 किमी गतीने प्रवासासाठी महामार्गाचं डिझाईन करण्यात आलं आहे. महामार्गावर 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज आहेत. तर कसारा घाटातून जाताना 6 बोगदे आहेत. अनेक वाहनं तसेच पादचारी अंडरपास आहे. इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ 8 किमी लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आलाय. अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फूल वॉटर मिस्ट सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number