बड्या ज्वेलरी ब्रँड साठी छाया कदम झाल्या खास चेहरा !

खरंतर सध्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स ना देखणी, मॉर्डन असलेली अभिनेत्री लागते पण हाच विचार मोडून काढत छाया कदम एका मोठ्या ब्रँड चा महत्त्वपूर्ण भाग झाल्या आहेत.

बड्या ज्वेलरी ब्रँड साठी छाया कदम झाल्या खास चेहरा !

जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली ती म्हणजे छाया कदम ! गेल्या काही वर्षांपासून छाया ने तिच्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध करत अनेक उत्तम प्रोजेक्ट्स सोबत बॉलिवुड गाजवल आणि आज महिला दिनाच्या दिवशी त्या एका मोठ्या ज्वेलरी ब्रँड चा महत्त्वपूर्ण चेहरा बनल्या आहेत. 

खरंतर सध्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स ना देखणी, मॉर्डन असलेली अभिनेत्री लागते पण हाच विचार मोडून काढत छाया कदम एका मोठ्या ब्रँड चा महत्त्वपूर्ण भाग झाल्या आहेत. ज्वेलरी ब्रँड म्हटलं की सगळ्यांना डोळ्या समोर एखादी मोठी अभिनेत्री किंवा मॉडेल दिसते पण यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम या त्यांच्या अभिनयाचं सोनेरी रूपाने या ब्रँड चा खास चेहरा झाल्या आहेत. 

छाया कदम हे नाव साता समुद्रापार पोहचलं खर पण भारतात देखील आज हे नाव तेवढ्याच ताकदीने घेतलं जातंय. त्यांच्या अभिनयाचं वेगळेपणं सगळ्यांना आपसूक मोहून जातंय. छाया ताई नी आजवर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका अगदी ताकदीने पार पाडल्या आणि त्यांनी बॉलिवुड च्या सोबतीने जगभरात स्वतःची वेगळी ओळख संपादन केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number