Mumbai Airport : बरीच विमाने रद्द, काहींचे मार्ग बदलले… , मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार बंद; कारण काय?

मुंबईतील सर्वात मोठं आणि व्यस्त विमानतळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 20 नोव्हेंबर 2025 रोजी बंद राहणार आहे. कारण काय जाणून घ्या..

Mumbai Airport : बरीच विमाने रद्द, काहींचे मार्ग बदलले… , मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार बंद; कारण काय?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात नावाजलेलं आणि मोठ विमानतळ आहे. दरम्यान हे विमानतळ 20 नोव्हेंबर 2025 रोजी बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईतील सर्वात व्यस्त असणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 20 नोव्हेंबर 2025 रोजी काही तासांसाठी बंद राहणार आहे.

तसेच भारतीय वेळेनुसार सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान रनवे बंद राहणार आहे. दर चार मिनिटाला येथे विमान लॅंन्ड होते. मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कोणतेही विमान लॅंन्ड किंवा टेकऑफ करणार नाही. पावसाळ्यादरम्यान धावपळींचे बऱ्याचदा नुकसान होते. त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी काही तास मुंबई विमानतळ बंद ठेवले जाते.

याचे नियोजन मागील काही महिन्यांपासून सुरू होते. याच वार्षिक पावसाळ्यानंतरच्या देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याच्या नियोजित कार्यक्रमाला सहयोग देण्यासाठी या विमानतळावरील अनेक विमानसेवा रद्द केले असून काही विमानांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत.

शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेचे काम केले जाणार असल्यामुळे या विमानतळावरील रनवे काही तासांसाठी बंद राहणार आहे. बऱ्याच कंपन्यांनी विमाने रद्द केली असून मुंबई विमानतळाऐवजी काही इतर ठिकाणी विमाने लॅंन्ड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. याबद्दलची माहिती प्रशासनाकडून आधीच विमान कंपन्यांना देण्यात आली होती. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील सर्वात मोठ विमानतळ आहे. विदेशात जाणारी विमाने मोठ्या संख्येने मुंबईतून जातात. जगातील जवळपास सर्वच देशाचे विमाने येथून टेकऑफ करतात आणि लॅंन्डही. या विमानतळावरुन रोज हजारो-लाखोंच्यावर विमाने रवाना होतात. येथे सर्व गोष्टींचे नियोजन अगदी पद्धतशीर बघायला मिळते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number