Chhatrapati Sambhajinagar : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचं भीषण सावट, 16 मार्चपासून पाणीपुरवठा बंद? ; जायकवाडी धरणाची 64 कोटींची थकबाकी

विविध योजनांकडील पाणीपट्टीची मोठी थकबाकी असल्याने जलसंपदा विभागाने नोटीस बजावली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचं भीषण सावट, 16 मार्चपासून पाणीपुरवठा बंद? ; जायकवाडी धरणाची  64 कोटींची थकबाकी

छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषद व विविध योजनांकडील पाणीपट्टीची मोठी थकबाकी असल्याने जलसंपदा विभागाने नोटीस बजावली आहे. येत्या 10 मार्चपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

थकबाकीदारांमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सुमारे 64 कोटींहून अधिक रकमेने अग्रस्थानी आहे. त्यानंतर गेवराई, जालना व पैठण नगर परिषदांचा समावेश आहे. दरम्यान, नाथषष्ठी उत्सवामुळे पैठणचा पाणीपुरवठा 10 मार्चऐवजी 16 मार्चपासून बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. थकबाकी तातडीने भरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

हेही वाचा – US Venezuela Gold Deal: व्हेनेझुएलाकडून अमेरिकेला होणार सोन्याचा पुरवठा; 650 किलो सोन्याच्या डीलमागील नेमकं 'गुपित' काय? 

महापालिकेने काही वर्षांपूर्वी पाणीपट्टी 4 हजार रुपयांवरून कमी करून 2 हजार 50 रुपये केली होती. तरीही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वसुली रखडली आहे. शहरात सध्या 1 लाख 20 हजार नळ कनेक्शन मनपाच्या नोंदीत आहेत.

हेही वाचा – Income Tax : कर चोरी करणं आता आणखीनच कठीण! करदात्यांवर 'सॅटेलाइट स्ट्राइक'' , 7000 कोटींची करचोरी आणि सुमारे 900 जणांना आयकर विभागाची नोटीस 

याच पार्श्वभूमीवर जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला लेखी नोटीस बजावत 15 मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा 16 मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number