आज महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीनिमित्त राज्यभरात मतदारराजाकडून मतदान पार पडत आहे. सकाळी 7.30 वाजता मतदान करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत अनेक अडचणी आणि गोंधळ झाल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड तर दुबार मतदार अशा गोष्टी बाहेर पडत आहेत. अस असताना छत्रपती संभाजीनगरमधून एकाच महापालिकेत एकच उमेदवार दोन पक्षांकडून दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खळबळजनक दावा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विट करत केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोठा दावा केला आहे.
हेही वाचा- BMC Election 2026 : मुंबईत पहिला दुबार मतदार मनसेच्या कचाट्यात सापडला! वार्ड क्रमांक 192 मध्ये नेमकं काय घडलं?
एकच उमेदवार एकाच महानगरपालिकेतील दोन पक्षांकडून दोन वेगवेगळ्या प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का? असा प्रश्न उपस्थित करत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी इम्तियाज जलील यांनी ट्विटमध्ये लिहले की, “एकाच महानगरपालिकेतील दोन वेगवेगळ्या वॉर्डांमधून पण एक उमेदवार दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवू शकतो का? हे घडत आहे @कॉमर्स_सीएसएमसी, जिथे एक उमेदवार एका वॉर्डमधून काँग्रेसच्या तिकिटावर आणि दुसऱ्या वॉर्डमधून व्हीबीएच्या तिकिटावर निवडणूक लढवत असेल! @ECISVEEP किंवा @सीईओ_महाराष्ट्र स्पष्ट करा?”
Can one candidate contest from two different political parties but from two different wards in same corporation?It’s happening in @commr_csmc where a candidate is contesting on Cong ticket from one ward & on VBA ticket from another ward!Can @ECISVEEP or @CEO_Maharashtra explain? — Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) January 14, 2026
हेही वाचा- Maharashtra Election 2026: मतदान केंद्रावर शाईऐवजी मार्करचा वापर, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघडकीस
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एक उमेदवार दोन भिन्न मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. मात्र जर तो दोन्ही प्रभागातून जिंकला तर त्याला एकाच प्रभागाचे नेतृत्व करता येईल. म्हणजेच त्याला एका मतदारसंघात राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल. मात्र महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या ट्विटमुळे हा उमेदवार कोण आहे याची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण एकीकडे तिकीट वाटपावरून इतका गोंधळ असताना एकाच उमेदवाराला दोन पक्षांनी कशी काय उमेदवारी दिली आणि याबाबतची माहिती इतर मित्रपक्षांना होती का? अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान हा उमेदवार कोणत्या प्रभागातून निवडून येतो ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.