Chhatrapati Sambhajinagar : ‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपबाबत आमदार नारायण कुचे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले ‘याप्रकरणी करणार अब्रू नुकसानीचा दावा’

ऑडिओ क्लिप फेक असून पैसे वाटपाचे आरोप नारायण कुचे यांनी फेटाळून लावले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar : ‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपबाबत आमदार नारायण कुचे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले ‘याप्रकरणी करणार अब्रू नुकसानीचा दावा’

विजय चिडे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे आमदार नारायण कुचे यांची कार्यकर्त्यासोबतची एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली. यामध्ये निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये पैसे वाटपाबाबत बोलले जात असल्याचे ऐकू येत आहे. मात्र हे ऑडिओ क्लिप फेक असून पैसे वाटपाचे आरोप नारायण कुचे यांनी फेटाळून लावले आहेत. नारायण कुचे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी अजिबात असे कधी बोललो नाही. मोडतोड करून ही ऑडिओ क्लिप तयार करण्यात आलेली आहे. ऑडिओ क्लिपचा आणि माझा काहीही संबंध नाही. विरोधीपक्षाला पराभव जिव्हारी लागल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आठही फेऱ्यांमध्ये आम्ही पुढे होतो. त्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला लोकांनी विश्वास आणि विकासाच्या भरवशावर निवडून दिले. त्यामुळे यांचा पराभव जिव्हाळा लागला. वंचितचा काहीही संबंध नसताना त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी माझ्यावर आरोप केले, एक कोटी दिल्याचा, पुन्हा म्हणले ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला. आम्ही घोटाळे केले असते तर एमआयएम कशाला निवडून आले असते. नारायण कुचेला आणि भाजपाला कसे बदनाम करायचे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. या ऑडिओ क्लिपला मी बिनबुडाचे आरोप मानतो, ऑडिओ क्लिप संदर्भात तक्रार दाखल केलेले आहे. या ऑडिओ क्लिप संदर्भातदेखील तक्रार दाखल करणार आहे. या ऑडिओ क्लिपची तक्रार मी करणार आहे अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार असून कोर्टात जाणार आहे, अशी भूमिका व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर आमदार नारायण कुचे यांनी घेतली आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आमदार नारायण कुचे यांच्यासोबत संवाद साधला. 

हेही वाचा : BMC Mayor: ठाकरेंच्या मनातलं देवाभाऊंच्या ओठावर? डाव फसला; मुंबईच्या महापौर पदासाठीचं सगळंच चित्र पलटणार?

काय आहे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये 

या क्लिपमध्ये आमदार नारायण कुचे एका कार्यकर्त्याशी संवाद साधत आहे. नुकतीच महापालिकांची निवडणूक पार पडली. यामध्ये नारायण कुचे यांच्या बहिणीलाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, लोकांना पैसे वाटपावरून येथे संभाषण सुरू आहे. कार्यकर्त्याच्या मते हे पैसे वाटप अंधार पडल्यानंतर करता येईल म्हटले जात आहे. तर उजेडातच पैसे वाटप होऊ द्या, असे कुचेंच्या बाजून बोलले जात आहे. आता ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी याची पुष्टी जय महाराष्ट्र चॅनेल करत नाही. मात्र यासंबधी आमदार नारायण कुचे यांची बाजू मांडण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number