मोठी बातमी! संजय केनेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक, घातपाताचा प्रयत्न?

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअरगन आढळल्याने खळबळ उडाली.

मोठी बातमी! संजय केनेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक, घातपाताचा प्रयत्न?

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. छत्रपती संभाजीनगर येथील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअरगन आढळून आल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कार्यालयात धाव घेऊन एअरगन व त्यासोबत असलेली बॅग जप्त केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंकज अतुलकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आमदार संजय केनेकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. यानंतर कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. एअरगन कार्यालयात कशी आणि केव्हा आली, ती कोणाची आहे, तसेच तिचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत एअरगनची तांत्रिक तपासणीही सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत कोणतीही गोळीबाराची घटना घडल्याचे संकेत नसले, तरी सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या व्यक्तींची माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number