Chandrashekhar Bawankule : "शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे पण…" कर्जमाफीवरून बावनकुळेंचं वक्तव्य; कर्जमाफीवरून बावनकुळेंचं वक्तव्य

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकर्‍यांकरिता कर्जमाफी संदर्भात दिलासा देणारी बातमी दिली आहे.

Chandrashekhar Bawankule : &quotशेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे पण…" कर्जमाफीवरून बावनकुळेंचं वक्तव्य; कर्जमाफीवरून बावनकुळेंचं वक्तव्य

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकर्‍यांकरिता कर्जमाफी संदर्भात दिलासा देणारी बातमी दिली आहे. कर्जमाफीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. त्यासाठी SOP तयार होत असून, थोडा वेळ लागेल पण कर्जमाफी निश्चित होईल. ज्यांच्याकडे मोठी मालमत्ता आहे त्यांना कर्जमाफी देणे योग्य नाही.” 

तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सरकारी जागेवर 1500 चौ.फुटांपर्यंत असलेले अतिक्रमण नियमबद्ध करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देखील बावनकुळेंनी यावेळी दिली आहे. मागेच माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना थेट इशार दिला होता. शेत आणि पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई करणार असल्याचा थेट इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शासकीय रस्ता अडवणाऱ्या किंवा त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी बंद करण्यात येणार असून यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या कोणत्याही योजना आणि मदतीसाठी पात्र ठरणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number