‘पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही’

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.

‘पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही’

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सेनेच्या उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत. यावर  उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. संसदेत नको त्या विषयावर चर्चा सुरू आहे. बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचारावर मोदींनी ठोस भूमिका घ्यावी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे जनतेने बघितल असल्याचे भाजपा आमदार बावनकुळे म्हणाले आहेत.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली.

बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरूस्ती विधेयकमंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती.

भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही,

यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते.

तुम्हाला विश्र्वगुरू पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही.

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर या पोस्टच्या माध्यमातून जहरी टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number