मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आधी ईव्हीएमवर बोलणारे आता मतदार यादीवर बोलतायत
असा आरोप त्यांनी मविआवर केला आहे. पराभव दिसताच शिउबाठाची भाषा बदलली असा निशाणा त्यांनी शिउबाठावरही त्यांनी आहे.
काँग्रेसने इतिहासात बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याची देखील त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर शिउबाठा ही काँग्रेसच्या मांडीवर बसली असून त्यांचा अजेंडा सोडून काँग्रेसच्याच अजेंडावर आपला पक्ष चालवत आहे अशी देखील टीका त्यांनी केली आहे.