Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Death : ‘दादा एवढे शब्दाला पक्के होते, एवढा मी देखील नाहीये…’, अजित पवारांच्या निधनानंतर चंद्रशेखर बावनकुळें भावूक

अजून देखील विश्वास बसत नाही, अजित दादा आपल्यात नाही, आता देखील फोन येईल अस वाटतं&quot.

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Death : ‘दादा एवढे शब्दाला पक्के होते, एवढा मी देखील नाहीये…’, अजित पवारांच्या निधनानंतर चंद्रशेखर बावनकुळें भावूक

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत  प्रत्येक जण शोक व्यक्त करत आहे. अनेक नेते-मंत्र्यांकडून शोक व्यक्त केला आहे. भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “22 वर्षाची आमची ओळख होती आणि आता अजित दादा आपल्यात नाहीयेत ही माझी फार मोठी वैयक्तिक हानी आहे, कौटुंबिक हानीदेखील आहे. अजून देखील विश्वास बसत नाही, अजित दादा आपल्यात नाही, आता देखील फोन येईल अस वाटतं”.

नंतर ते म्हणाले की,  “पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक गोष्टी केल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील वाईट दिवस आहे. आम्ही सर्व खूप दुःखात आहोत, माझं रात्री 10.45 वाजता बोलण झाले. मी विरोधी पक्षात होतो तेव्हा दादाचा आणि माझा संबंध आला दादा मला  घरातील समजत होते. 2024 ला पाहिला संबंध आला, मी विरोधी आमदार असून देखील माझी काम दादांनी केली”.

हेही वाचा – Ajit Pawar Last Speech: “काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं…” विमानाचा भीषण अपघात आणि चार दिवसांपूर्वीचे अजित पवारांचे ‘ते’ विधान 

“या घटनेबद्दल चुकीचं बोलणं अतिशय दुर्दैवी आहे, याचं राजकारण करू पाहणाऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हे असं थर्ड क्लास राजकारण करणे बरोबर नाही अस मला वाटत. ममता बॅनर्जींचा बुद्धी भेद झाला आहे, हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही”.

हेही वाचा – PV Sindhu on Ajit Pawar Death : ‘आता मला पश्चाताप…’, अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर फुलराणी पीव्ही सिंधूची भावनिक प्रतिक्रिया 

“शरद पवार साहेब कधीही दुर्दैवी गोष्टीचे राजकारण करत नाहीत. अमित शहा, नितीन गडकरी अंत्यदर्शना येणार आहेत. अजित दादा एकदा शब्द दिला की काहीही झाले तरी ते करून दाखवायचे. दादा खरं तर  एवढे शब्दाला पक्के होते, येवढा मी देखील नाही आहे”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number