बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वपक्ष जोरदार तयारीला लागले आहे. ठाकरे बंधुंच्या युतीनंतर काही ठिकाणी सेना-भाजप युती तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-सेना युती अशा अंतर्गत युती सध्या पाहायला मिळत आहे. एवढचं नव्हे तर अनेक पक्षनेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत आहेत. असं असताना महायुती फिसकटल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.
शुक्रवारी पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा धर्म बाजूला ठेवत सत्ताधारी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून आता भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता या विषयावरून राजकारण अधिक तापणार की कोणतं वळण घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- Ravindra Chavhan on Ajit Pawar : ‘आम्ही जर बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण निर्माण होईल’, रविंद्र चव्हाणांचा घणाघात
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही असे ठरवले आहे की, “निवडणूक लढवताना मित्रपक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाहीत, याची काळजी तीनही पक्षांनी घ्यायची आहे. अजित पवार असे का बोलले, याची मला माहिती नाही. त्यांनी असे बोलायला नको होते. आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसून ठरवलेले आहे की, आपण मित्र पक्षात विरोधात जरी लढलो तरी महायुतीत कुठलेही मतभेद होणार नाही याची सर्व पक्षांनी काळजी घ्यायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंतच्या निवडणुकीच्या भाषणात कुठल्याही मित्रपक्षावर आणि मित्रपक्षातील नेत्यांवर टीका न करता विकासावर बोलण्याचे काम केले. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना माझी विनंती राहिल की, त्यांनी मित्रपक्षात मतभेद निर्माण करू नयेत. आम्ही त्या भानगडीत पडणार नाही. आम्ही मित्र पक्षात मोठ्या भावाच्या रुपात आहोत. त्यामुळे कुठलेही उत्तर देणे किंवा टीकाटप्पनी करणार नाही. पण अजित पवारांना माझी विनंती आहे की, आपसात समन्वय राखावा. मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी”.
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातले महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असाव याचं उदाहरण सेट करत आहोत. कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेल्या. आता ही निवडणूक होत आहे. मागील वर्षानुवर्ष पुण्यात ज्या गतीमान पधतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहेत. infrastruture ला कामाला गती दिली जात आहे. कोट्यवधी रुपये दिले जात आहे. महापालिकेच्या स्थापनाच्या वेळेपासून स्वप्न साकार करायचं असेल तर त्या दिशेने पावलं उचलली पाहीजे. पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव महापालिकेत झाला त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्ता असताना सुधा महाविकास आघाडीला मेट्रो सुरू करता आले नाही त्यांनी चालू केलेच नाही. त्यांना करायचे नव्हते. त्यांनी सगळं काही केलं नाही. मोदींचा सरकार आल्यावर मेट्रो सुरु झाली ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळ झाल आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाक के देखना चाहिए”