चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन ३० ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत.

चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन ३० ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच चंपई सोरेन यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही महिने तुरुंगात होते. या काळात पक्षाने एकमताने चंपई सोरेन यांना झारखंडचे मुख्यमंत्री केले होते. हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर अचानक कोणतीही कल्पना न देता पक्षाने चंपई सोरेन यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. याआधी मुख्यमंत्री असूनही चंपई यांना महत्त्वाच्या बैठका घेऊ नका असे सांगण्यात आले. त्यांची अडवणूक केली गेली. या प्रकाराने नाराज झालेल्या चंपई यांनी हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यांतच झारखंड मुक्ती मोर्चातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चंपई यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपाला पुन्हा एकदा झारखंडच्या राजकारणात सक्रीय होण्याची संधी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number