नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ‘एक देश, एक निवडणूक’साठी केंद्र सरकारला शिफारस करणार आहे. समितीमध्ये माजी राष्ट्रपती कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंह, लोकसभेचे माजी चिटणीस सुभाष सी कश्यप, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरिश साळवे, माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी यांचा समावेश आहे. देशाचे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विशेष निमंत्रित म्हणून समितीच्या बैठकांना उपस्थित असतील. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समितीच्या स्थापनेची दिली.