Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेचा यू-टर्न; भरती प्रक्रियेत हिंदी-इंग्रजीसोबत आता मराठी भाषेचा समावेश

मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत मराठी भाषेला स्थान देत प्रशासनाने सुधारित अधिसूचना जाहीर केली आहे.

Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेचा यू-टर्न; भरती प्रक्रियेत हिंदी-इंग्रजीसोबत आता मराठी भाषेचा समावेश

मुंबई: मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत भाषाविषयक वाद निर्माण झाल्यानंतर अखेर प्रशासनाने मोठा निर्णय घेत मराठी भाषेचा समावेश केला आहे. 16 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेसाठी केवळ इंग्रजी आणि हिंदी या भाषांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये मराठीला स्थान न दिल्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या निर्णयाचा तीव्र निषेध करत मनसे नेते अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला होता. महाराष्ट्रात भरती प्रक्रिया होत असताना मराठी भाषेला डावलणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर हा प्रश्न अधिकच चर्चेत आला.

हेही वाचा: Iran-US War Impact on Internet: समुद्राच्या तळाशी नेमकं काय शिजतंय? भारतासह जगातील इंटरनेट वापरावर टांगती तलवार, इराणने प्रसिद्ध केला ‘तो’ नकाशा

वाढत्या दबावानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पहिली अधिसूचना रद्द केली. त्यानंतर 22 एप्रिल 2026 रोजी नव्याने जाहीर केलेल्या अधिसूचनेत मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. आता उमेदवारांना इंग्रजी, हिंदीसोबत मराठीतूनही परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक भाषेला न्याय मिळाल्याचे मत व्यक्त होत असून, भविष्यातही अशा भरती प्रक्रियेत प्रादेशिक भाषांचा सन्मान राखला जावा, अशी मागणी होत आहे.

एकूणच, मराठी भाषेच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. “महाराष्ट्रात मराठीच” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे. 

हेही वाचा: Luggage Lost Helpline: रेल्वे प्रवासात बॅग हरवली आहे?; घाबरू नका! ‘या’ सोप्या ट्रिकने पुन्हा मिळवा तुमची बॅग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number