केंद्र सरकार आणखी पाच लसींना मंजुरी देणार

गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढतोय. गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज कोरोनाच्या १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणखी पाच लसींना मंजुरी देण्याची शक्यता आहे. वर्षाच्या […]

केंद्र सरकार आणखी पाच लसींना मंजुरी देणार

गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढतोय. गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज कोरोनाच्या १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणखी पाच लसींना मंजुरी देण्याची शक्यता आहे. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

देशात सध्याच्या घडीला दोन लसींचा वापर केला जात आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा वापर देशभरात सुरू आहे. देशात लसीकरणानं वेग घेतला असला तरी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आणखी पाच लसींना लवकरच मान्यता दिली जाणार आहे .

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number