India Labour Code: नवीन लेबर कोडला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा; केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

केंद्र सरकारने चार नवीन लेबर कोड लागू केल्यानंतर भारतीय मजदूर संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

India Labour Code: नवीन लेबर कोडला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा; केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जुने कामगार कायदे रद्द करून चार नवीन लेबर कोड लागू करण्याचा निर्णायक निर्णय घेतला आहे आणि या बदलाचे देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हितासाठी उचललेले हे पुढाकाराचे पाऊल असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी जाहीर केले. त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाने (Bhartiy Mazdoor Sangh, BMS) देखील या सुधारणांचे स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

आज BMS च्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांची भेट घेऊन लेबर कोडशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा केली आणि आवश्यक सूचना दिल्या. यावर मंत्री मांडवीया यांनी या सर्व मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करण्याचे आणि गरज भासल्यास संसदेत आवश्यक दुरुस्त्या करण्याचे आश्वासन दिले. भारतीय मजदूर संघाने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, चार लेबर कोड लागू करण्याचा निर्णय हा देशातील सर्व कामगारांच्या सन्मान आणि सुरक्षा वाढवणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या कोडमुळे कामगार वर्गाला अधिक मजबूत हक्क, समान सुविधा आणि सुरक्षित कार्यपरिसर मिळण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा: New Gratuity Rule: आता, 5 वर्षांच्या सेवेसाठी नव्हे तर फक्त एका वर्षाच्या सेवेसाठीही मिळणार ग्रॅच्युइटी; कोणाला होणार फायदा?

BMS ने स्पष्ट केले आहे की, देशभरात या लेबर कोडची सुरळीत अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांचा पूर्ण पाठिंबा असेल. कामगार कल्याण हेच प्रशासनाचे केंद्रबिंदू राहावे, यासाठी ते सातत्याने सरकारशी संवाद साधत राहतील. न्याय्य आणि समावेशक कामगार व्यवस्थेकडे जाण्यासाठी घेतलेले हे पाऊल देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास भारतीय मजदूर संघाने व्यक्त केला आहे.

कामगारांच्या समस्यांबाबत मंत्र्यांनी दाखवलेल्या सकारात्मक दृष्टीकोनाबद्दल BMS ने त्यांचे विशेष आभार मानले आहेत. नवीन लेबर कोड तयार करताना बदलत्या रोजगार बाजाराचा विचार करण्यात आला आहे. असंघटित क्षेत्रातील मोठ्या कामगार वर्गाला सामाजिक सुरक्षेचे जाळे मिळावे, वेतनाचे संरक्षण वाढावे आणि नवीन उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हक्कांची हमी मिळावी, या उद्देशाने सुधारणा करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Baba Vanga Prediction: जगावर 2026 मध्ये मोठं संकट येणार? काय आहे बाबा वेंगा यांचं धडकी भरवणारं भाकित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number