देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र या निर्णयामुळे मूल्यांकन कशा पद्धतीने होणार याबाबत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये, तसेच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या मुल्याकनाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
Addressing all the students and other stakeholders regarding board exams. @EduMinOfIndia @cbseindia29 @PIB_India @MIB_India @DDNewslive @transformIndia @mygovindia https://t.co/phBgdeLFei — Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) June 25, 2021
दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना निकाल असमाधानकारक वाटत असेल, त्यांच्यासाठी कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक म्हणाले आहेत.
‘विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांच्या क्षमतांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील, त्यांच्यासाठी ऑगस्टमध्ये ऐच्छिक परीक्षा आयोजित करण्यात येईल’, असं पोखरियाल म्हणाले.
तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेची काळजी न करता आपल्या आरोग्याची काळजी करावी, असं म्हणत विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि क्षमतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं आश्वासनही रमेश पोखरीयाल निशंक यांनी दिलं आहे.