मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रमुख आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 86 किलो लाडू, थीम असलेले बॅनर आणि त्यांच्या राजकीय प्रवासाचे फोटो पॅनल दाखवण्यात आले आहेत. गेल्या 60 दशकाहून अधिक काळ मराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे शरद पवार आज, 12 डिसेंबर 2025 रोजी आपला 86 वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 36 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे शरद पवार राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते. पुढे राज्य आणि केंद्रात विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्य आणि कौशल्यनीतीने राजकारणात अमुलाग्र बदल घडवून आणले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
VIDEO | Mumbai: Celebrations for Sharad Pawar’s 86th birthday at YB Chavan Auditorium feature 86 kg of laddus, themed banners, and photo panels showcasing his political journey.#SharadPawar #Mumbai #Birthday (full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/Ggq0MgVFY5 — Press Trust of India (@PTI_News) December 12, 2025
शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट केले आहे.
Birthday wishes to Rajya Sabha MP Shri Sharad Pawar Ji. Wishing him a long and healthy life.@PawarSpeaks — Narendra Modi (@narendramodi) December 12, 2025
Heartiest birthday greetings to senior leader, Sharad Pawar ji!
Wishing you a long life and good health! ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!@PawarSpeaks pic.twitter.com/u0LdMnkwRo — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2025
श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी;
लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!! pic.twitter.com/r1U4NxaVVZ — Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2025
गेल्या सहा दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, शेती, क्रीडा, सहकार आदी विविध क्षेत्रात अव्याहतपणे राबणारे धुरंधर राजकारणी, शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच्या पालखीचे भोई, महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचे हक्काचे #साहेब, सामान्य माणसाचा #आधारवड… pic.twitter.com/TbobswlLwl — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2025