‘स्वत:चा पक्ष नसलेले वर्धापन दिन साजरा करतायत’

आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. काय म्हणाले नितेश राणे? “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं […]

‘स्वत:चा पक्ष नसलेले वर्धापन दिन साजरा करतायत’

आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं आज पहिल्यांदा मोकळा श्वास घेत आहे. काल ओसाड गावाचे पाटील उद्धव ठाकरे यांनी शिबिर घेतलं आहे. निवडणूक आयोगानं यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं नाव आणि मशाल चिन्ह दिलं आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचं चिन्ह नाही शिवसेनेचं नाव नाही आणि ही लोकं शिवसेना वर्धापन दिन साजरा करत आहे.
“संजय राजाराम राऊत यांना महाविकास आघाडीमध्ये कोणी मोजत नाही. संजय राजाराम राऊत यांना कुणी भाव देत नाही. संजय राजाराम राऊत यांची किंमत किती आहे? हे महाविकास आघाडीकडून वारंवार सांगितलं जात.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number