केंद्र सरकारनी सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी दिली परवानगी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वृत्त पीटीआय सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत चर्चा झाली असून बैठकील […]

केंद्र सरकारनी सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी दिली परवानगी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वृत्त पीटीआय सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत चर्चा झाली असून बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. शिवाय या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती. फायझर, सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली असून २ जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. कोरोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यापूर्वी आसाम, गुजरात पंजाब, आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला परवानगी देण्यात आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number