CBSE दहावीची परीक्षा आता दोन वेळा; 2026 पासून नवा निर्णय लागू

CBSE 2026 पासून दहावीची परीक्षा दोनदा घेणार; पहिली फेब्रुवारीत, दुसरी मेमध्ये ऐच्छिक परीक्षा; विद्यार्थ्यांना तीन विषयांमध्ये दुसरी संधी मिळणार.<br/>

CBSE दहावीची परीक्षा आता दोन वेळा; 2026 पासून नवा निर्णय लागू

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 2026 पासून विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता दहावीची बोर्ड परीक्षा दोन वेळा घेतली जाणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात, तर दुसरी परीक्षा मे महिन्याच्या मध्यात घेतली जाणार आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार असून, शैक्षणिक तणावही कमी होईल, असा मंडळाचा विश्वास आहे. विशेष म्हणजे, दुसरी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना दोन भाषा आणि तीन विषयांपैकी कोणत्याही एका भाषेत किंवा विषयात दुसरी संधी मिळणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एकूण तीन विषयांमध्ये दुसरी परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

हेही वाचा:Big decision of the Union Cabinet: केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पुणे मेट्रो टप्पा 2 ला दिली मंजूरी

दुसऱ्या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर होईल. मात्र, अंतर्गत मूल्यांकन हे वर्षातून एकदाच केलं जाणार आहे.

CBSE च्या या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या परीक्षेत संधी उपलब्ध होईल, जे त्यांच्या अंतिम गुणपत्रकात समाविष्ट होईल. शिक्षण व्यवस्थेत या बदलामुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक ठोस होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number