CBSE Counseling Support : तज्ज्ञांचा समूह, 24 तास मदत आणि टोल-फ्री क्रमांक; CBSE बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी कसली कंबर; पाहा नवा उपक्रम

परीक्षा काळातील तणावाशी सामना करण्यासाठी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

CBSE Counseling Support : तज्ज्ञांचा समूह, 24 तास मदत आणि टोल-फ्री क्रमांक; CBSE बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी कसली कंबर; पाहा  नवा उपक्रम

नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य देत Central Board of Secondary Education (CBSE) ने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत Psycho-Social Counselling Services च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली आहे. हा पहिला टप्पा 6 जानेवारी 2026 पासून सुरू झाला असून, तो 1 जून 2026 पर्यंत चालणार असल्याची माहिती बोर्डाने अधिकृत निवेदनातून दिली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश परीक्षा काळातील ताणतणाव (Exam Stress), चिंता आणि मानसिक दबाव कमी करणे हा आहे. 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या थिअरी परीक्षा (Theory Exams) आत्मविश्वास, मानसिक समतोल आणि स्पष्ट विचारसरणीसह विद्यार्थ्यांनी द्याव्यात, यासाठी ही सेवा राबवली जात आहे.

या सहाय्य सेवांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 27×7 हेल्पलाईन (Helpline). विद्यार्थी 1800118004 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून हिंदी आणि इंग्रजी भाषेत मदत घेऊ शकतात. IVRS (Interactive Voice Response System) द्वारे ताणमुक्त अभ्यास पद्धती, वेळ व्यवस्थापन (Time Management), तणाव नियंत्रण (Stress Management), तसेच CBSE संबंधित महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना कधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा: Foreign Minister S. Jaishankar : भारत – युरोप संबंधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा परराष्ट्रमंत्र्यांनी केली व्यक्त; म्हणाले, '2026 हे वर्ष…'

याशिवाय विद्यार्थी आणि पालकांना 73 प्रशिक्षित तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची सुविधा दिली आहे. या पॅनेलमध्ये CBSE संलग्न शाळांचे प्राचार्य (Principals), समुपदेशक (Counsellors), विशेष शिक्षक (Special Educators) आणि पात्र मानसोपचार तज्ज्ञ (Psychologists) यांचा समावेश आहे. यापैकी 61 समुपदेशक भारतात असून, उर्वरित 12 जण नेपाळ, जपान, कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे कार्यरत आहेत.

CBSE च्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) विद्यार्थ्यांसाठी तणाव व्यवस्थापन, प्रभावी अभ्यास तंत्र (Study Strategies) आणि भावनिक आरोग्यावर आधारित निवडक माहितीपूर्ण साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे साहित्य सोप्या, संक्षिप्त आणि सहज समजेल अशा स्वरूपात तयार करण्यात आले आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले.

CBSE ने विद्यार्थी आणि पालकांना या सेवा मोठ्या प्रमाणावर वापरण्याचे आवाहन केले असून, परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे नमूद केले आहे. Psycho-Social Counselling Services हा CBSE चा वार्षिक कार्यक्रम असून, 2025 मध्ये या उपक्रमाचा पहिला टप्पा 1 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान राबवण्यात आला होता. परीक्षा काळातील तणावाशी सामना करण्यासाठी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

हेही वाचा: Donald Trump: आधी ब्लॅकआउट केला, मग 150 फायटर जेट्स पाठवले अन्…" ट्रम्प यांनी उघड केली वेनेझुएलातील 'ऑपरेशन एबसॉल्यूट रिजॉल्व'ची इनसाईड स्टोरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number