दिल्लीतील कथित मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणाची चौकशी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालपर्यंत जाऊन पोहोचली आहे. या संदर्भात सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले असून १६ तारखेला अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीला बोलावल्याची माहिती आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली. त्यानंतर आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर आपचे नेते संजय सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे, असा आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. यामुळे आता राजधानीतच मोठा राजकीय संघर्ष पेटलेला आहे. संजय सिंह म्हणाले, “देशासमोर तुमचे सगळे काळे पराक्रम उजेडात आणण्याचे काम अरविंद केजरीवालींनी केले आहे. हे काम चालूच राहील, थांबणार नाही. १६ तारखेला केजरीवालांना अटक करण्याची, केजरीवालांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला गेला आहे. मात्र या कट कारस्थानामुळे अरविंद केजरीवालांचा आवाज दबणार नाही, असे संजय सिंह म्हणाले.
दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया अटकेत आहेत. ईडी आणि सीबीआयने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आता केजरीवाल यांच्या अडचणींमध्येही वाढ होणार असल्याचं दिसतंय. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत येवून पोहोचला आहे. मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचीही सीबीआय चौकशी करणार आहे. केजरीवालांना 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजाण्यात आले आहेत. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर राहणार का?