३० जुलै, २०२४, पुणे : पुण्यातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या फलकावर सहमती शिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे.
या संदर्भात सोमवारी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे फलक लावले होते. त्या फलकांवर मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे आणि काही महिलांचे फोटो लावण्यात आले होते. संमतीशिवाय फोटो फलकावर का लावला ? असा प्रश्न महिलांनी विचारला आहे.