Manoj Jarange : विश्वास बसत नाही, दादांचं निधन झालं; अजित दादांच्या निधनानंतर बोलताना जरांगे पाटील प्रचंड भावूक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. यावर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी भावून होत प्रतिक्रिया दिली आहे. 

Manoj Jarange : विश्वास बसत नाही, दादांचं निधन झालं; अजित दादांच्या निधनानंतर बोलताना जरांगे पाटील प्रचंड भावूक

महाराष्ट्राचे वित्त मंत्री, बीड आणि पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. कर्मभूमी असलेल्या बारामतीत अजित पवारांनी अखेरचा श्वास घेतला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत,  त्याच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते. त्यावेळी लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी पवारांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला.  ज्यात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी भावून होत प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस…, अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आपल्या दादांची दुःखद बातमी कळाली. आपल्या अजित दादांबद्दल जी बातमी कळाली ती मनाला पटतच नाहीय. अनेकांना संपर्क केला आणि सगळ्यांनी सांगितलं पण, चॅनेलवर देखील पाहिलं तरी पण विश्वास बसत नाही की, अजित पवार यांच अपघाती दुःखद निधन झालं आहे. दादा गेल्याने राज्याची खुप मोठी हानी झाली खुप मोठं नुकसान झालं आहे. असा नेता होणे नाही…. आता ही दुःखाची पोकळी भरून काढली जाऊ शकत नाही. संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्पष्टपणे काम करणारे दादा कोणाच काम होणार असेल तर होणार म्हणार, कोणाच काम नाही होणार असेल तर नाही म्हणार… सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या प्रश्नांचे काम दादा करायचे”. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number