दोन गटातील किरकोळ वादातून उंटाची हत्या

परभणी : दोन गटात झालेल्या वादातून उटांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. परभणीत ही घटना घडली आहे. गायरान जमिनीवर ऊंट चारण्यावरून सय्यद कुटुंबासोबत स्थानिक लोकांनी वाद घातला. कांचन भोसले आणि आनंता शिंदे या दोघांनी, उंट गावातील गायरानात का चारतोस यावरुन हा वाद झाला. या किरकोळ वादावरुन उंटास कुऱ्हाडीने गंभीररीत्या जखमी करून ठार मारले. जालन्यातील […]

दोन गटातील किरकोळ वादातून उंटाची हत्या

परभणी : दोन गटात झालेल्या वादातून उटांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. परभणीत ही घटना घडली आहे.

गायरान जमिनीवर ऊंट चारण्यावरून सय्यद कुटुंबासोबत स्थानिक लोकांनी वाद घातला. कांचन भोसले आणि आनंता शिंदे या दोघांनी, उंट गावातील गायरानात का चारतोस यावरुन हा वाद झाला. या किरकोळ वादावरुन उंटास कुऱ्हाडीने गंभीररीत्या जखमी करून ठार मारले.

जालन्यातील घनसावंगी येथील गुलाब सय्यद हे भटके कुटुंब आहे. हे कुटुंब आपल्या उंटासह माळेगावच्या यात्रेला निघाले होते. त्यांचा कबिला सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे मुक्कामी थांबला होता. यावेळेस ही घटना घडली.

गुलाब सय्यद यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल केलाय. दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number