राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आज राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली, या बैठकींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून ९ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत,या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काही लोकोपयोगी निर्णय ज्याची राज्यातील जनता आतुरतेने वाट पाहत होती, असे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या बैठकीत बुलेट ट्रेनसंदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच सर्व प्रकारची परवानगी दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सर्व प्रकारच्या मंजुरी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.यासह पेट्रोल-डिझेल आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाले.मुख्यमंत्री शिंदेंनी याविषयीची माहिती दिली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा नरेंद्र मोदी यांचा अतिमहत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होता. मात्र, जमीन हस्तांतरण प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने या प्रकल्पाला वेळ लागला. तसेच, कोरोनाच्या काळातही हे काम थांबले होते. त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील केवळ २० टक्केच जमिनीचे हस्तांतरण झाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा या प्रकल्पाला विरोध होता, त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत उचित सहाय्य केले नाही.
राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार सत्तेत येताच, मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाला गती प्राप्त होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. या प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकारची मंजुरी दिली आहे. ५०८ किमीचा हा प्रकल्प आहे.त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे.