Buldhana News: बुलढाण्यात शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद; महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद उफाळला.

Buldhana News: बुलढाण्यात शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद; महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्सवाचे वातावरण असताना बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात मात्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून गावात वाद पेटला आणि त्याचे रूपांतर थेट मारहाणीपर्यंत झाले. माहितीनुसार, पुतळा बसवण्याच्या ठिकाणाबाबत दोन गटांमध्ये मतभेद होते. चर्चा तीव्र होत गेल्याने वातावरण तापले आणि महिलांमध्येच धक्काबुक्की व हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. या गोंधळात एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

घटनेदरम्यान संबंधित महिला पदाधिकाऱ्याला जमावाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकाराचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने तीव्र नाराजी व्यक्त करत आत्महत्येची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number