Buldhana District Bank Election: 18 वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल; 254 उमेदवार रिंगणात, बिनविरोध निवडीसाठी खलबतं सुरू

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. 254 उमेदवार कायम असल्याने 19 जागांवरील निवडणुकीची चुरस वाढली आहे.

Buldhana District Bank Election: 18 वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल; 254 उमेदवार रिंगणात, बिनविरोध निवडीसाठी खलबतं सुरू

बुलढाणा: तब्बल 18 वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, मतदानाची वेळ जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला असून ही निवडणूक प्रत्यक्ष मतपेटीतून होणार की राजकीय सहमतीतून संचालकांची निवड केली जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यामुळे त्यापूर्वी प्रमुख नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी बैठका आणि चर्चांना वेग आला आहे. काही जागांवर सर्वानुमते उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अनेक नव्या दावेदारांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्यास नकार दिल्यास बिनविरोध निवडीचे प्रयत्न अडचणीत येऊ शकतात.

254 अर्ज कायम, चुरस वाढली

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी तब्बल 298 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 254 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांसाठी इच्छुकांची मोठी संख्या पाहता निवडणुकीची रंगत वाढली आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित 19 जागांसाठी कोणत्या पद्धतीने अंतिम चित्र स्पष्ट होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; तब्बल 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा

खामगावातील बैठकीकडे लक्ष

बिनविरोध निवड करण्याच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू असून, खामगाव येथे होणाऱ्या बैठकीत याबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटप, उमेदवारांची माघार आणि विविध राजकीय गटांमधील समन्वय यावर बैठकीत तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, प्रत्येक इच्छुक उमेदवाराला निवडणुकीत उतरण्याची इच्छा असल्याने सर्वांना एका निर्णयावर आणणे नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे. प्रतिष्ठेच्या जागा, पक्षांतर्गत स्पर्धा आणि सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे यामुळे वाटाघाटी सहज होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

आर्थिक संकटातून बँकेला उभारी

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकेकाळी गंभीर आर्थिक अडचणीत सापडली होती. सुमारे बारा वर्षांपूर्वी बँकेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने बँकेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली. प्रशासकीय नियंत्रणाखाली असताना बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचा दावा करण्यात आला असून, बँकेने 23 कोटी 55 लाख रुपयांचा नफा मिळवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता निवडून येणाऱ्या संचालक मंडळाची भूमिका बँकेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: Maratha Kunbi Certificates : कुणबी वैधतेसाठी ओघ वाढला! राज्यातील 2 लाख 96 हजार 246 अर्जाची पडताळणी; तर10 हजार 843 अर्ज प्रलंबित

23 ऑगस्टला मतदान, 24 ऑगस्टला निकाल

निवडणूक कार्यक्रमानुसार 21 संचालक पदांसाठी 23 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्टपर्यंत किती उमेदवार माघार घेतात आणि किती जागा बिनविरोध होतात, यावर निवडणुकीचे अंतिम स्वरूप अवलंबून राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number