Maharashtra Budget 2026 : यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार?

राज्याच्या अर्थ खात्याचा कार्यभार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाऊ शकतो.

Maharashtra Budget 2026 : यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस सादर करणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाले. २८ जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवारांनी शेवटचा श्वास घेतला. अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. अजित पवारांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडचे अर्थमंत्रिपद कोणाकडे जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. राज्याचे अर्थमंत्रीच गेल्याने आता अर्थसंकल्प कोण सादर करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याच्या अर्थ खात्याचा कार्यभार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाऊ शकतो. देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. दर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. 2026-27 साठी अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Maharashtra Weather Update: हवामानाचा यू-टर्न; थंडी गायब, आता ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा नवा अंदाज 

 आता अजितदादांच्या निधनानंतर अर्थमंत्री कोण होणार आणि अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अजित पवारांनी मागील सलग 6 वर्षे अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, अजित पवारांनी आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी आपल्या कारकी­र्दीत एकूण १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number