ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये राजकीय सत्तासंघर्षात आता पंतप्रधानांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. ब्रिटन देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ४८ तासात त्यांच्या ५० हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. बोरिस यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव वाढत चालल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. विशेष म्हणजे ३६ तासांपूर्वी मंत्री झालेल्या मिशेल डोनलन यांनी […]

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये राजकीय सत्तासंघर्षात आता पंतप्रधानांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. ब्रिटन देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ४८ तासात त्यांच्या ५० हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. बोरिस यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव वाढत चालल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. विशेष म्हणजे ३६ तासांपूर्वी मंत्री झालेल्या मिशेल डोनलन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला होता. नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता.काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले होते तर काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती

Boris Johnson | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा | Marathi News

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number