पुणे : ब्रिटिशकालीन पुल कोसळयाची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. पुण्यामध्ये ही घटना घडली आहे. तळेगाव-आंबी या गावांना जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल होता. हा पूल भल्या पहाटे कोसळला.

कोसळलेला पूल हा ब्रिटिशकालीन असून 100 वर्षांपेक्षा जूना होता. तसेच हा पूल धोकादायक असल्याचे शासनाने जाहीर केलं होतं. तसेच पूलपरिसरात पूल धोकादायक असल्याचे सूचनाफलक लावण्यात आले होते. असे असून देखील सर्रासपणे या पूलावरुन वाहतुक सुरु होती.
दरम्यान ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरवला असल्याने प्रशासनाकडून याआधीच पर्यायी सोय करण्यात आली आहे. प्रशासनाने तळेगाव-आंबी या गावांना जोडणाऱ्या पूल निर्माण करण्यात आलेला आहे.