BMC Election 2026 : राज्यातीलचं नव्हे तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका ‘BMC’!; 50 देशांच्या जीडीपीपेक्षाही BMC चा खजाना जास्त

भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज, 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या, 16 जानेवारी रोजी सर्वांच्या समोर येईल. मुंबई महापालिकेसह 29 महापालिकासाठी निवडणूक होत आहे. मात्र सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत. त्याच कारणही खास आहे. मुंबई ही राज्यातीलच नव्हे तर, देशातील सर्वांत श्रीमंत […]

BMC Election 2026 : राज्यातीलचं नव्हे तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका ‘BMC’!; 50 देशांच्या जीडीपीपेक्षाही BMC चा खजाना जास्त

भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज, 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या, 16 जानेवारी रोजी सर्वांच्या समोर येईल. मुंबई महापालिकेसह 29 महापालिकासाठी निवडणूक होत आहे. मात्र सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत. त्याच कारणही खास आहे. मुंबई ही राज्यातीलच नव्हे तर, देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका आहे. मुंबई महापालिकेचं बजेट हे 74,427 कोटींच्या घरात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ महापालिकेवर सत्ता गाजवली आहे. मात्र, यंदाची निवडणूक वेगळी आहे. 227 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप आमने-सामने आहेत. महापालिकेची स्वतःची रुग्णालये, मेडिकल कॉलेज, फायर ब्रिगेड आणि स्वतःच्या मालकीची धरणे (तलाव) आहेत. ज्यामुळे ही सत्ता गमावणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. 

तुलनात्मक आकडेवारी 2025-2026

मुंबई महानगरपालिका : 74,427 कोटी रुपये
रुणाचल प्रदेश : 39.842 कोटी रुपये
मणिपूर : 35,103 कोटी रुपये
त्रिपुरा : 32,423 कोटी रुपये
लडाख : 4,692 कोटी रुपये

गेल्या दशकात महापालिकेचे उत्पन्न सातत्याने वाढलं आहे. महापालिकेकडे एक मजबूत मुदत ठेवी(फिक्स्ड डिपॉजिट) देखील आहेत, ज्याच्या व्याजाचाही कमाईत समावेश होते. 2024 – 25 या आर्थिक वर्षात बीएमसीचे एकूण उत्पन्न 81 हजार 774 कोटी होतं असा अंदाज आहे. विविध सेवांसाठी शुल्क, परवाने आणि वापरकर्ता शुल्क, हे बीएमसीचे उत्पन्नाचे सर्वात मोठे स्रोत आहेत. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून ग्रांट आणि सबसिडी, कर आणि गुंतवणूक आणि राखीव निधीवरील व्याज याचाही उत्पन्नात वाटा आहे.

करातूनही मिळणारा पैसा

2016 ते 2025 दरम्यान, महापालिकेला शुल्क आणि वापरकर्ता शुल्कातून 94 हजार 600 कोटी रुपये मिळाले. यामध्ये रजिस्ट्रेशन शुल्क, ॲडमिशन फी, लेट लायसन्स रिन्यूअल चार्ज, स्विमिंग पूल बुकिंग चार्ज, तोड़फोड़ शुल्क, जाहिरात शुल्क आणि पाणी कनेक्शन फी यासह इतर शुल्कांचा समावेश आहे. याच कालावधीत, महापालिकला विविध सरकारी योजना आणि इतर सरकारी संस्थांकडून सेवा देण्याऐवजी 86 हजार 700 कोटींची ग्रांट आणि सबसिडी मिळाली. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 2023-24 या आर्थिक वर्षात, महापालिकने वांद्रे-कुर्ला रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून 61.7 कोटी रुपये जमा केले. तर आर्थिक वर्ष 2016 ते 2025 दरम्यान, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रस्ते कर, थिएटर टॅक्स, वीज कर, मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स), पाणी कर यासारख्या करांमधून 75 हजार 800 कोटी रुपये कमावले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number