कर्नाटकातील चिक्कामागलुरू जिल्ह्यातील तारिकेरे तालुक्यातील खेड्यातून धक्कादायक घटना घडली आहे. ऐन लग्नात प्रेयसीने लग्नाला आलेल्या पाहुण्यांसमोर विष पिऊन त्याचे लग्न खराब करण्याची धमकी दिल्यानंतर वराने लग्नमंडपातून पळ काढला. त्यामुळे वधूच्या कुटुंबाला धक्का बसला. वधूच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न तिथेच करायचं ठरवलं. त्यांनी लग्नाच्या हॉलमधूनच योग्य वर शोधण्याचा विचार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सिंधूच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी एक योग्य वर शोधला. बीएमटीसी कंडक्टर म्हणून काम करणारा चंद्रप्पा नावाच्या पाहुण्याने सिंधूशी लग्न करण्यास सहमती दर्शविली. या लग्नाला दोघांच्या कुटुंबाने सहमती दिली आणि त्याच दिवशी सिंधू आणि चंद्रप्पाचे लग्न पार पडले.