लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण उपसचिवांनी ३ जून पासूनच निलंबित केल्याचे शिक्षण आदेश दिले होते. धनगर यांच्या निलंबनाचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी जारी केले आहेत. लाचखोर उपनिबंधक सतिश खरे, सुनीता धनगर हे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या जामीन अर्जावर आज (ता. ९) सुनावणी […]

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण उपसचिवांनी ३ जून पासूनच निलंबित केल्याचे शिक्षण आदेश दिले होते.

धनगर यांच्या निलंबनाचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी जारी केले आहेत. लाचखोर उपनिबंधक सतिश खरे, सुनीता धनगर हे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या जामीन अर्जावर आज (ता. ९) सुनावणी होणार आहे. धनगर या गेल्या बुधवारपर्यंत (ता. ७) पोलीस कोठडीत होत्या.धनगर यांना पन्नास हजार तर जोशी याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबी नुकतेच पकडले होते. महापालिका मुख्यालयात सहा वाजेनंतर काम करता येत नाही, असे असताना धनगर या संध्याकाळी सहा वाजेनंतर संबंधितांना बोलावून घ्यायच्या असे तपासात उघड झाले आहे.

लाच स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आधार घेतला जायचा. या काळात रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. मी कामासाठी भरपूर वेळ देते, अशा गमजा धनगर मारायच्या. जोशी याला घरातूनचं पाच हजार रुपये आणण्याची ताकीद असल्याचे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

निलंबनाच्या कालावधीत शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय नाशिक महापालिका क्षेत्र सोडण्यास मनाई करण्यात अली आहे. निलंबनाच्या कालावधीत दुसरी खाजगी नोकरी अथवा व्यवसाय न करण्याचे आदेश. आदेश झुगारून खाजगी नोकरी अथवा व्यवसाय केल्यास गैरवर्तणुकी बाबत दोषी ठरवून कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील. भविष्य निर्वाह निधींवरील हक्क ही गमावून बसतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number